नाशिक

चांदवड जवळ भीषण अपघात.. एसटी बस आणि ट्रक च्या भीषण अपघातात ६ जण….

 

नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत सहा प्रवासी ठार तर सुमारे ३० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती चांदवड पोलीसानी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, जळगाव कडून वसई कडे जाणाऱ्या बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या ट्रक ने जोरदार धडक दिली, ही धडक इतकी जोरदार होती की, यात एसटी महामंडळाच्या बसचा चकानाचुर झाला असून ६ प्रवाश्यांचा मृत्यू तर ३० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या अपघातानंतर मोठी वाहतूक कोंडी झाली होती मात्र चांदवड पोलीस आणि महामार्ग पोलीस यांनी घटनास्थळी महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे