यावल

यावल तालुका होमगार्ड समादेशकपदी विजय जावरे यांची नियुक्ती..

यावल दि.२२ ( सुरेश पाटील ) जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये यावल तालुका समादेशकपदी विजय जावरे यांची नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या या नियुक्ती बद्दल होमगार्ड पथकाने तसेच यावल पोलीस दलाने अभिनंदन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,जळगाव यावल तालुका प्रभारी समादेशक अधिकारी भानुदास कवडिवाले सं.क्र.११६६ हे वयानुसार होमगार्ड सेवेतुन सेवानिवृत्त झाल्याने जिल्हा समादेशक अधिकारी तथा अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते यांच्या आदेशान्वये यावल तालुका समादेशक अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या जागी सं. क्र. ११९८ अंशकालीन लिपिक विजय जावरे यांची तालुका समादेशक अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.नुतन तालुका समादेशक अधिकारी हे तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती करण्यात आली आहे.दि. १८ जुलै २०२४ रोजी याबाबतचे आदेश काढण्यात आले. रविवार दि.२१ जुलै २०२४ रोजी यावल येथे सेवानिवृत्त तालुका समादेशक अधिकारी यांच्या सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी नुतन यावल तालुका समादेशक अधिकारी विजय जावरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यावेळी माजी तालुका समादेशक अधिकारी भगतसिंग पाटिल,माजी कंपनी कमांडर शशिकांत फेगडे,माजी पलटण नायक रमेश चौधरी,अरुण काळे,शिवराम येऊल यांच्यासह यावल तालुक्यातील होमगार्ड उपस्थित होते.

ईतर महत्वाच्या बातम्या 

१ कोटी ६ लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त,विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई..

‘स्वच्छ शाळा प्रतियोगिता’ ही केवळ एक स्पर्धा न राहता चळवळ व्हावी! – डॉ. अनिल काकोडकर

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे