गुन्हेगारीमुक्ताईनगर

१ कोटी ६ लाखाच्या मुद्देमालासह गुटखा जप्त,विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई..

मुक्ताईनगर: मध्यप्रदेशातून गुटखा घेवून येणाऱ्या कंटेनवर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पथकाने कारवाई केली. त्या वाहनातून सुमारे ७६,१२,८०० रुपयांचा राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला.

मध्यप्रदेशातून अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याने त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस निरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने दि. २० जुलै रोजी सकाळी मुक्ताईनगर पोलीस ठाणे हद्दीतील बऱ्हाणपुर चौफुली येथे सापळा रचला. याठिकाणाहून गुटख्याची वाहतुक करणारे (एचआर ५५, ऐक्यू ३८७३) क्रमांकाचे कंटरनेला पथकाने थांबवले. त्या कंटेनरची तपासणी केली असता,त्यामध्ये 76,12,800/- किमतीचा  पान मसाला व जाफरानी जर्दा आढळून आला त्यासह, 30,00,000 रू.किमतीचा कंटेनर,5000 रु. किमतीचा मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी गुटख्याची वाहतुक करणाऱ्या कंटेनर चालक लियाकत अली इस्लाम खान (रा. मचरोली, जि. मेवात, हरियाणा) व ट्रान्सपोर्ट करणारा सतीश शर्मा (रा. दिल्ली) व त्यांचा हस्तक मुबारक रा. दिल्ली व कंपनी मालक नीलू पंजाबी उर्फ निशू (रा. भिवाडी, राजस्थान) यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक अरुण भिसे, पोहेकॉ तुषार पाटील, विक्रांत मांगडे, विजय बिलगे, प्रमोद मांडलिक, चालक पोशि सुरेश टोंगारे यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे