शेतीपिक नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी ई KYC- करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन..
जळगाव – जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई -केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांच्यामार्फत ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न करण्यात आले होते. तरी देखील अदयापही शेतकऱ्यांनी e-KYC न केल्यामुळे शेतकरी अनुदानापासून वंचीत आहे. त्या सर्वांनी ई -केवायसी करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यातील सन २०२२ पासून शेतीपिकाच्या नुकसानीचे अनुदान वितरित करण्यासाठी वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. त्यानुसार २ लाख १३ हजार ४१६ शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन डीबीटी प्रणालीद्वारे जवळपास २४४ कोटी अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.मात्र जिल्ह्यातील १२ हजार ५०८ शेतकऱ्यांनी ई – केवायसी चे प्रमाणिकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरुन अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नाही. त्यासाठी गावस्तरावरील तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांचेमार्फत ई – केवायसी करण्यासाठी यापूर्वी प्रयत्न करण्यात आले आहे. तरी देखील अद्यापही काही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी ई – केवायसी न केल्यामुळे अनुदानापासून वंचीत आहेत.
विशेषत: माहे जानेवारी २०२४ ते माहे मे २०२४ या कालावधित जिल्ह्यातील भडगाव, मुक्ताईनगर, पारोळा ,अमळनेर व जामनेर या तालुक्यात अवेळी पावसामुळे शेती पिकाच्या नुकसानपोटी ५ हजार ८५४ शेतकऱ्यांनी ई- केवायसी प्रमाणीकरण केले नसल्यामुळे शासन स्तरावरून अनुदान मंजूर झालेले असूनही अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करता आले नाही.
तरी संबंधित शेतकरी यांनी सी एस सी केंद्र व महा ई सेवा केंद्र येथे जाऊन ई – केवायसी करावे व आपले शेतपिकाच्या नुकसानीचे अनुदान त्वरीत प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन सर्व संबंधित शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.