चोपडा ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई : ४५ लाखांचा गांजा जप्त..
चोपडा – तालुक्यात ४५ लाखाचा गांजा जप्त आरोपी मात्र फरार झाला असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील मालापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानुसार दि. ६ रोजी चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी पथकासह या ठिकाणी छापा टाकला. यादरम्यान शेतात ७५० किलो ग्रॅमचा ओला गांजा मिळून आला. हा गांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत जवळपास ४५ लाख रुपये आहे. संशयित आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा रा. डॅडीया पाडा ह. मु. चोपडा यांच्या शेतात गांजाची झाडे आढळून आले. पोलीस आल्याचे आरोपीच्या लक्षात आल्याने आरोपी हा फरार झाला.
याबाबत फिर्यादी पोलीस हे.कॉ. चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरुद्धात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, उप पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पो.हे.कॉ. गणेश मधुकर पाटील करीत आहे.