मुक्ताईनगर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा पक्ष -एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर– बोदवड तालुक्यातील कोल्हाडी, जामठी,करंजी गावातीलविविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री आ एकनाथराव खडसे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी आ.एकनाथराव खडसे यांनी प्रवेश घेणाऱ्यांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा रुमाल टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.

प्रवेश घेणाऱ्यां मध्ये कोल्हाडी येथिल भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते श्रीकृष्ण राणे, नामदेव लढे, प्रमोद ढाके बोदवड माजी पं स सभापती दिपालीताई राणे यांचे पती जिवन राणे जामठी येथिल गोटू गायकवाड, सुभाष गायकवाड, तुकाराम माठकर, संजय शेळके, शांताराम शिंदे, विठ्ठल पाटील, शे. मोबीन शे. भिकन, हसहाक खाटीक, सागर गायकवाड, तुषार पवार, संग्राम ठाकूर, रवींद्र पारधी, संजय पांचाळ, सागर व्यवहारे, करण पारधी, देवा शिंदे, शुभम भिलारे, दीपक चांदणे, इम्रान शहा, इरफान शहा, अविनाश माळकर, जीत शर्मा, आनंद तेली, अजय शिंदे, समीर शिंदे, सुभाष शेळके, करण उगले, सुरेश साबणे, मयूर पाटील, गौरव गोरे, शुभम पाटील, ओम कचोरे करंजी येथिल माजी सरपंच जानकीराम देवराम पाटील बापू पिंजारी, गजानन कोळी, गजानन माळी, भास्कर पारधी, सुपडू हरणे, संजय बोंडे, धर्मराज पाटील, गजानन गावंडे, संजय हरणे आणि सावदा येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक अजमल खान आणि मोहम्मद कैफ यांचा समावेश आहे याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना रोहिणी खडसे म्हणाल्या

राष्ट्रवादी कॉँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष

शरद पवारांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या हितासाठी व नव तरूणांसह शोषित वंचित घटकांना न्याय देण्यासाठी कटीबध्द आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सर्वांचे स्वागत करते आगामी काळात सर्व मिळून एकजुटीने कार्य करू आ. एकनाथराव खडसे, जेष्ठ नेते रविंद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे ध्येय धोरणे,कामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवू आणि येत्या विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा फडकवू असा विश्वास रोहिणी खडसे यांनी व्यक्त केला तसेच आपण सर्व जण गावाच्या विकास कामांसाठी सोबत आले आहेत विकास कामांसाठी आ. एकनाथराव खडसे यांच्या माध्यमातून निश्चितच पाठपुरावा करू असे रोहिणी खडसे म्हणाल्या याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ .एकनाथ खडसे म्हणाले

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा छञपती शिवराय, छञपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या  पुरोगामी आणि लोकाभिमुख विचारांवर चालणारा पक्ष असून संविधानाचा आदर, लोकशाही मूल्यांचे जतन करणारा, समाजातील वंचीत घटकांप्रती सामाजिक न्यायाची भावना जपणारा शेतकरी, कष्टकरी,महिला, तरुण यांचे हित जपणारा पक्ष असून या पक्षात सर्व जातिधर्म , गोरगरिब यांना न्याय आणि नेतृत्वाची संधी मिळते मा.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची दमदार वाटचाल सुरू आहे.आगामी विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने मेहनत घेण्याचे आ. एकनाथराव खडसे यांनी आवाहन केले तसेच कोल्हाडी येथिल जुन्या सहकाऱ्यांनी आज पक्षात प्रवेश केला याचा मनस्वी आनंद आहे

तुमच्या गावातील विकासकामांसाठी आतापर्यंत निधी दिला असुन आगामी काळात सुद्धा राहिलेले विकास कामे पुर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आ. एकनाथराव खडसे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले याप्रसंगी तालुका अध्यक्ष प्रशांत आबा पाटिल,रामदास पाटिल, कैलास चौधरी, निलेश पाटिल, सतिष पाटिल, प्रदिप बडगुजर, शाम सोनवणे ,मयुर खेवलकर उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे