गुन्हेगारीजळगाव

विजेच्या तार चोरी करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळयात…

जळगाव – जिल्ह्यात शेतकऱ्यांचे शेतातील इलेक्ट्रीक पोल वरील तार चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याबाबतचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेश स्थानिक गुन्हे शाखेला पोलीस अधीक्षकांनी दिले होते.

त्यावरुन वरिष्ठ बबन आव्हाड पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांनी पोउपनिरी राहुल तायडे, पोह संदिप पाटील, प्रविण मांडोळे, नंदलाल पाटील, भगवान पाटील, राहुल कोळी, विलास गायकवाड, राहुल बैसाणे, गोरख बागुल, भारत पाटील सर्व नेम. स्थागुशा जळगाव अश्यांचे पथक तयार करण्यात आले होते.पथकातील अधिकारी व अमंलदार यांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे कासोदा व एरंडोल शेत शिवारातील इलेक्ट्रीक पोलवरील तार चोरी करणारे इसम एरंडोल शहरात संशयीतरीत्या फिरत असल्याची बातमी मिळाल्याने त्यांचा शोध घेवून त्यांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्यांची नावे १) रविंद्र अनिल मिस्तरी वय ३८ रा. साई नगर, एरंडोल, २) धनराज प्रकाश ठाकुर वय ४६ रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल ३) समाधान नारायण पाटील वय ४५ रा. नारायण नगर, एरंडोल असे सांगीतले त्यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी शेतातील तार चोरी केल्या बाबत कबुली दिली असून त्यांचे कडून एकूण ५ गुन्हे उघडकीस आणले असून त्यांचे कडून १,५०,०००/- रु कि.ची ३८०० मीटर विजेची तार हस्तगत करण्यात आली असून सदर आरोपीतांना पुढील तपासकामी एरंडोल पो.स्टे.चे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई महेश्वर रेड्डी, पोलीस अधिक्षक जळगांव व कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ईतर महत्वाच्या बातम्या 

चोपडा ग्रामीण पोलीसांची मोठी कारवाई : ४५लाखांचा गांजा जप्त..

१०० रुपयांचा स्टॅम्प होणार बंद : सरकारचा मोठा निर्णय..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे