जिल्हाधिकारी कार्यालय नवीन नामफलकाच्या प्रतीक्षेत..
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नामफलकाचा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून प्रलंबीत..

जळगाव – जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय केंद्र असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाला नवीन नामफलक मिळण्यासाठी वर्षा पासून प्रतीक्षा करावी लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नवीन नामफलका विना आहे.

काही दिवसांपूर्वी पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारारील जुन्या नाम फलकाची अवस्था अत्यंत खराब झाली होती. फलकावरील अक्षरे तुटून पडली होती, अर्धा फलक देखील तुटलेला होता. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्या नंतर तो अर्धवट तुटलेला नामफलक काढण्यात आला होता.

सदर फलक काढल्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांच्या काळात जिल्ह्यात अनेक मोठ मोठ्या कामांना मंजुरी देण्यात आली असेल. अनेक मोठ मोठ्या कामांच्या निविदा निघाल्या असतील काही कामांना सुरवातही झाली असेल काही कामे पूर्ण देखील झाले असतील परंतु जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वारा वरील नामफलकाच्या प्रतीक्षेतच आहे.परंतु बऱ्याच दिवसांपासून नवीन नाम फलक लावण्याचा प्रशासनाला जनु विसरच पडलाय?
नागरिक, ग्रामस्थ, आणि विविध बाहेर गावावरून कामांसाठी येणाऱ्या व्यक्तींना कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे.विशेषतः बाहेरगावाहून येणाऱ्यांना कार्यालय ओळखणेही काही वेळा कठीण जात असल्याचे समोर आले आहे .दरम्यान, नागरिकांचा सवाल असा आहे की, जिल्ह्याच्या सर्वोच्च प्रशासकीय कार्यालय जर विना नामफलकाचे असेल.व नवीन नाम फलक लावण्यास इतका विलंब होत असेल, तर इतर कामांची गती कशी असेल?
काही दिवसांपूर्वीच नवीन जिल्हाधिकारी रोहन घुगे हे रुजू झाले असून,नामफलका बाबत त्यांनी सांगितले की आकर्षक आणि टिकाऊ असा नवीन नामफलक लवकरात लवकर लावण्यात येणार आहे.
आता नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात किती दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा वरील नवीन नाम फलक लावण्यात येईल. व जिल्हाधिकारी कार्यालयाची प्रतीक्षा संपेल.याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.