रावेर

सामाजिक सलोखा जपण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याचा अभिनव उपक्रम..

रावेर प्रतिनिधी – हमीद तडवी

रावेर – पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सामाजिक सलोखा आणि सर्वधर्म समभाव वाढवण्यासाठी रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने “एकता क्रिकेट कप २०२५” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या अभिनव उपक्रमाचा उद्देश विविध धर्मीयांमध्ये ऐक्य, सलोखा आणि परस्पर सामंजस्य वाढवणे हा होता.

क्रिकेटच्या माध्यमातून एकतेचा संदेश

रावेर येथील व्ही.एस. नाईक कॉलेजच्या मैदानावर या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले. यात रसलपुर रॉयल, वाघोड वॉरियर्स, रावेर टायगर्स, पाल रॉयल, के-हाळा फायटर्स आणि होमगार्ड पोलीस पाटील पत्रकार अशा सहा संघांनी सहभाग घेतला. अंतिम सामन्यात रसलपुर रॉयल संघाने वाघोड वॉरियर्स संघावर विजय मिळवत “एकता क्रिकेट कप २०२५” जिंकला.

संपूर्ण मालिकेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. रितेश पवारने “मॅन ऑफ द मॅच” आणि “मॅन ऑफ द सिरीज” दोन्ही किताब पटकावले. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अतुल विंचुरकर तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून मुजाहिद यांना गौरविण्यात आले.

प्रमुख उपस्थिती आणि सहकार्य

या उपक्रमाचे उद्घाटन जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी श्री.अंकीत यांच्या हस्ते झाले. सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, तहसीलदार बंडु कापसे, गटविकास अधिकारी खेमचंद वानखेडे आणि विविध धर्मीय प्रतिष्ठित नागरिकांनी या उपक्रमाला हजेरी लावली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उप निरीक्षक घनश्याम तांबे, पोलिस हेड कॉनिस्टेबल विठ्ठल देशमुख, पोलिस नाईक पुरुषोत्तम पाटील आणि पोलिस कॉनिस्टेबल नितीन सपकाळे यांनी विशेष मेहनत घेतली.

सामाजिक सलोखा वाढवण्याचा आदर्श उपक्रम

रावेर पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित “एकता क्रिकेट कप” हा सामाजिक सलोखा जपण्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण ठरला आहे. या उपक्रमामुळे समाजातील विविध घटकांमध्ये एकात्मतेचा संदेश पोहोचला असून नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे