
जळगाव – राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.या तपासणीत जिल्हा परिषदेच्च्या ४ कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी चौघा कर्मचाऱ्या विरुद्ध बुधवार दि १४ जानेवारी रोजी CEO यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची uid कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
1) भालचंद्र नारायण पवार,(आरोग्य सहाय्यक जिल्हा प्रशिक्षण केंद्र जळगाव,)
2)छाया घनश्याम भोळे,(आरोग्य साहाय्यिक प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोड,)
3)संदीप विनायक सोनवणे, (आरोग्य सेवक प्राथमिक आरोग्य केंद्र तरवडे ता चाळीसगाव )
4)गणेश मुरलीधर महाजन, (आरोग्य सहाय्यक पिंपरखेड ता भडगाव)
या चौघांच्या तपासणी दरम्यान तफावत आढळून आली असल्याने चौघाविरूध्द बुधवार दि १४ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या पूर्वी देखील दिव्यांग कर्मचारी तपासणीत टक्केवारी तपासणीत तफावत आढळून आलेल्या चार कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.