जळगावात ९ किलो गांजासह एकास अटक : एमआयडीसी पोलिसांची कारवाई..
जळगाव – एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गोपणीय माहितीनुसार, एक ईसम हा मेहरुण बगीचा परीसरात गांजा घेऊन विक्रि करण्याच्या उद्देशाने मोटार सायकल वर फिरत आहे अशी माहिती मिळाली होती.सदरची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना समजली असता, त्यांनी स्वतः तसेच पथक तयार केले. सदर पथकाने गांजा विक्रि करणा-या इसमाचा शोध घेत असतांना तो शिवाजी महाराज उदयान मेहरुण बगीचा येथे चारही बाजुंनी सापळा रचुन एका संशईतांस ताब्यात घेतले. त्याचेजवळ एक गांजा भरलेली गोणी मिळुन आल्याने पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी शासकिय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा धारक, फॉरेन्सीक व्हॅन यांना घटनास्थळी पाचारण करुन संशईत मुकेश विष्णु अभंगे वय 43 वर्ष रा कंजरवाडा तांबापुर जळगाव याचे ताब्यातुन 09 किलो 522 ग्रॅम गांजा आणी होंडा युनीकॉर्न मोटार सायकल असा एकुण 1,07, 132/- रुपये चा मुद्देमाल जप्त केला आहे. पोना प्रदीप चौधरी यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. सदर गांजा बाळगणा-यास अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास पोउनि सचीन नवले, पोका चेतन पाटील हे करीत आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनि राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सफौ दत्तात्रय बडगुजर, पोना योगेश बारी, पोका नितीन ठाकुर, राहुल घेटे, योगेश घुगे यांनी केली.
एमआयडीसी पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात आली की, अवैधरीत्या कोणी अंमली पदार्थांची विक्रि करीत असल्यास त्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला तात्काळ खबर दयावी, खबर देणा-याचे नांव गोपणीय ठेवण्यात येईल.