जळगाव

हिंदु जनजागृती समितीची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार..

खोट्या तक्रारी करून हिंदूंना जाणीवपूर्वक त्रास देणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि ‘सी.जे.पी.’ संस्थेवर कारवाई करण्याची मागणी.

यावल दि.१०(सुरेश पाटील) – हिंदू संघटना, हिंदुत्वनिष्ठ नेते,  तसेच हिंदु जनजागृती समिती यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करणार्‍या तिस्ता सेटलवाड आणि त्यांच्या ‘सिटिझन्स फॉर जस्टीस अँड पीस’ (सी.जे.पी.)या संस्थेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांना या संदर्भात तक्रार सादर करण्यात आली.

तक्रारीच्या वेळी हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर, महाराष्ट्र – गोवा बार कौन्सिलचे माजी चेअरमन ज्येष्ठ विधीज्ञ भरत देशमुख,अधिवक्ता पंकज पाटील तसेच योग वेदांत सेवा समितीचे अनिल चौधरी हे उपस्थित होते.

सी.जे.पी.’ संस्थेच्या कारवायांमागे हिंदुविरोधी कटाचा संशय : हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि हिंदू नेत्यांविरुद्ध खोट्या तक्रारींची मालिका उभी करून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. या कारवायांसाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून फंडिंग घेतले आहे का, तसेच यामागे ‘डिप स्टेट’ आणि ‘शहरी नक्षलवाद’ यांचे काही देश व हिंदु विरोधी कटकारस्थान आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी समितीने केली आहे.तिस्ता सेटलवाड यांच्यावर आधीपासून गंभीर आरोप : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात खोटे आरोप करणे, न्यायालयात खोटे पुरावे सादर करणे आणि साक्षीदारांना खोट्या साक्षीसाठी फूस लावणे, आर्थिक गैरव्यवहार आणि विदेशी निधीतील घोटाळे करण्यासंदर्भात आरोप सेटलवाड व तिच्या संस्थेवर झालेले आहेत.

हिंदूंवर खोट्या तक्रारी दाखल करून छळ :

हिंदू संघटनांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन होत आहे, ज्यात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 19(1)(अ) अंतर्गत मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचाही समावेश आहे. समितीच्या उपक्रमांमुळे कधीही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. या तक्रारीची प्रत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृह सचिव यांनाही पाठवण्यात आल्याचे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे संपर्क करा
WhatsApp Group