आमदार अमोल जावळे झाडा झडती करीत आहे परंतु निगरगठ्ठ, निष्क्रिय अधिकाऱ्यांवर शून्य परिणाम..
कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना निलंबित करायला पाहिजे?
यावल दि.१७ ( सुरेश पाटील ) रावेर विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय आमदार अमोल दादा जावळे विजयी झाल्यापासून सक्रिय कामकाज करीत आहेत त्यांनी आतापर्यंत अनेक कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन झाडा झडती करून नागरिकांच्या अडचणी लक्षात घेता काही अधिकारी,कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या अडीअडचणी सोडवून महत्त्वाची कामे करण्याच्या सूचना दिल्या परंतु काही निगरगठ्ठ, निष्क्रिय अधिकारी कर्मचाऱ्यांवर शून्य परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की सर्वात प्रथम त्यांनी शहरात ठीक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनाला दिल्या होत्या आणि आहेत नगरपालिकेने काही ठराविक ठिकाणी साफसफाई करून कामकाज केल्याचा देखावा केला.त्यात त्यात दुभाजकाची रिपेरी न करता नाममात्र रंगोटी करून शासनाच्या तिजोरीला आर्थिक रंग लावला. एसटी स्टँड मालकीच्या जागेवर साफसफाई करण्याचा कांगावा केला खरी परंतु नगरपालिका संचलित साने गुरुजी विद्यालयाच्या क्रीडांगणाची साफसफाई केव्हा करणार..? साने गुरुजी विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आजूबाजूचे रहिवासी दररोज सकाळी प्रातःकाल विधी करून दुर्गंधी व घाण पसरवीत आहे याकडे नगरपालिका केव्हा कार्यवाही करणार..?
यावल भुसावळ रस्त्याची डाग डूजी निकृष्ट प्रतीची करण्यात आल्याने त्या डाग डूजी तीन दिवसात बारा वाजून खड्डे जैसे थे झाले आहेत.
यावल भुसावल रोडवरील महाराष्ट्र गुजरात ढाबा समोर रस्त्याच्या बाजूला घाण दुर्गंधीयुक्त पाण्याचा नाला तयार झाला असून या ठिकाणी गेल्या वर्षी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे निकृष्ट बांधकाम झाल्याने त्या ठिकाणी आज दयनीय अवस्था झाली आहे,यावल शहराजवळ बंद पडलेल्या भुसावळ नाक्याजवळ वळणावरती कशी दयनीय अवस्था झाली हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिसून येत नसल्याने यंत्रणा किती निष्क्रिय आणि निगरगठ्ठ झाली आहे हे आमदार अमोलदादा जावळे यांनी प्रत्यक्ष पाहाणी केल्यास खात्री होईल.
यावल बुरुज चौकापासून बस स्टॅन्ड पर्यंत निकृष्ट अर्धवट असे डांबरीकरण जे केले ते डांबरी करण्याच्या आधी रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर अतिक्रमण झाले आहे ते अतिक्रमण काढले गेले नाही यामुळे अधिकारी कर्मचारी आणि अतिक्रमणधारकांचा कसा समन्वय आहे हे दिसून येत आहे.वड्री- हरिपुरा या रस्त्यावर १ कोटी ९३ लाख रुपये किमतीच्या पुलाचे बांधकाम झाले परंतु पुलाच्या रस्त्यावरील अतिक्रमण काढताना शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून संबंधितांवर गुन्हा दाखल झाला परंतु आता पुढे काय..? रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार असे संपूर्ण सातोद, कोळवद,वड्री, हरीपुरा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये बोलले जात आहे.यावल येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना एक्स-रे मशीनची व इतर काही सुविधा उपलब्ध होत नसल्याने रुग्णांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.यावल येथील सिटी सर्वे कार्यालयात सुद्धा आमदार अमोलदादा जावळे यांनी भेट देऊन वेळेवर कामे करण्याची ताकीद दिली होती तरी सुद्धा सिटी सर्वे कार्यालयातून वेळेवर कामे होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
आमदार अमोलदादा जावळे कार्यालयात जाऊन झाडाझडती करीत असताना सुद्धा अधिकारी वेळेवर कामे करीत नसल्याने तसेच बोगस, निकृष्ट प्रतीची कामे करीत असल्याने त्यांना सूचना देऊन सुद्धा त्यांच्यावर शून्य परिणाम होत असल्याने आमदार अमोलदादा जावळे यांनी आता यापुढे निगरगठ्ठ, निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन झाडा झडती न करता कर्तव्यात कसूर करणाऱ्यांना,तसेच मंजूर,प्लॅन, इस्टिमेट प्रमाणे कामे न करणाऱ्या आणि निकृष्ट बोगस प्रतीची कामे करणाऱ्यांना यापुढे निलंबित करण्याची कार्यवाही करायला पाहिजे अशी चर्चा जनतेमध्ये आहे.