आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने ग्रामीण भागात ६ हजार ६०८ घरकुलांचे मंजुरी आदेशाचे वितरण…
यावल दि.२४ (सुरेश पाटील) – चोपडा विधानसभा मतदारसंघाचे प्रा.आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नाने त्यांच्या कार्यक्षेत्रात तथा यावल तालुक्यात ६ हजार ६०८ घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी आदेशाचे वितरण गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्या व आमदार सोनवणे यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत करण्यात आले.
शनिवार दि.२२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी पंचायत समिती यावल सभागृहामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याने २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षा यावल तालुक्यासाठी ६ हजार ६०८ ‘ घरकुल’ योजना साठी मंजूर झाले असून या मंजूर लाभार्थीं पैकी प्रतिनिधी स्वरूपात काही लाभार्थींना यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांच्या हस्ते व आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या खास प्रतिनिधीच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंजुरी पत्र वितरण करण्यात आले.
यावल पंचायत समिती कार्यालयात चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांचे प्रतिनिधी सूर्यभान पाटील सर,भरत चौधरी सर, सुधाकर पाटील,दिनकर महाजन, आबा पाटील,भरत पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी तथा गटविकास अधिकारी मंजुषा गायकवाड,हबीब तडवी विस्तार अधिकारी,कर्मचारी वर्ग व लाभार्थी यांना मंजुरी आदेशाचे वितरण अधिकारी व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार प्राध्यापक सोनवणे यांनी आवास योजनेच्या प्राथमिक अडीअडचणी प्रथम सोडवल्या..
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काही गावांमध्ये लाभार्थ्यांना जागेविषयीच्या अडचणी आल्या होत्या त्या अडचणी शासकीय स्तरावर पाठपुरावा करून सोडवण्यासाठी चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांनी मोलाचे प्रयत्न केल्याने लाभार्थ्यांना त्याचे मोठे सहकार्य लाभले त्यामुळे शेकडो लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार सोनवणे यांचे प्रतिनिधी भरत चौधरी सर यांनी दिली.