यावल दि.२४ ( सुरेश पाटील ) – फेब्रुवारी अखेर उन्हाळ्याची चाहूल लागली असून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्याचबरोबर यावल तालुक्यात आगीचे चटके सुद्धा बसायला लागले आहेत.
तालुक्यात आग लागण्याच्या किरकोळ घटना घडायला सुरुवात झाली त्याप्रमाणे आज दुपारी
तालुक्यातील सावखेडासिम लगत असलेल्या शेती शिवारात शेत गट नंबर ८५ मध्ये गुरांच्या गोठ्याला आग लागून सुमारे २ लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा पाण्याचे काम महसूल विभागातर्फे सुरू आहे. सावखेडा सिम येथील बिस्मिल्ला नबाब तडवी यांचे शेतात असलेल्या गुरांच्या गोठ्याला आज सोमवार दि.२४ रोजी दुपारी अडीच वाजेची सुमारास अचानक आग लागून यात शेती उपयोगी अवजारे मटेरियल पत्रांचे शेड रासायनिक खताच्या ३० गोण्या ठिबक नळ्या २५ बंडल सुप्रीम पाईप दोन्हींची ५२ नग सुप्रीम पाईप अळीचे इंची ७५ नग दोन पंप फवारणी स्टार्टर २ पाण्याची टाकी १००० लिटरची असे एकूण २ लाखाचे नुकसान झाल्याचा पंचनामा तलाठी निशांत मोहोळ यांनी केल्याचे समजल यावेळी दहिगाव चे तलाठी मिलिंद कुरकुरे तसेच पोलीस पाटील पंकज बडगुजर सामाजिक कार्यकर्ते अनिल बडगुजर सेवानिवृत्त फौजी हुसेन तडवी यांचे सह अनेकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले यावल नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी तत्काळ बोलवण्यात आली होती बिस्मिल्ला तडवी यांनी दोन दिवसापूर्वी पीव्हीसी पाईप नुकतेच आणले होते ही आग अचानक कशी लागली याबाबत मात्र ग्रामस्थांमध्ये चर्चा असून आगीचे नेमके कारण काय..? आगीचे नुकसान त्वरित मिळायला पाहिजे अशी मागणी होत आहे.