यावल दि.२५ ( सुरेश पाटील ) – तालुक्यातील दहिगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात ६ महिन्यात दोनदा साहित्याची फेका – फेक केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
दहिगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात आज दुपारी गावातील एका तरुणाने ग्रामपंचायत कार्यालयात प्रवेश करून सामानाची फेकाफेक केली व कर्मचाऱ्यांवर हात उचलून धक्काबुक्की केल्याप्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आज दि.२५ रोजी दहिगाव येथील विशाल उर्फ भैया राजू पाटील याने सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात का येत नाही या कारणावरून कर्मचाऱ्यास दमदाटी करीत मारहाणी केली व त्यास आवर घालणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही त्याने अरेरावी केली याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामपंचायत कार्यालयात सामानाची फेका फेक करण्याची ६ महिन्यातील दुसरी घटना आहे यापूर्वी देखील एका तरुणाने ग्रामपंचायत कार्यालयात घुसून ग्रामपंचायतचे सामानाचे फेकाफेकी केली होती व सरपंच आणि गावातील लोकप्रतिनिधींना शिवीगाळ केली होती या प्रकरणी यावल पोलिसात तो निर्वाळा करण्यात आला होता. आता ही पुन्हा दुसऱ्यांदा घटना घडली. सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात हजर का राहत नाही..? याबाबत फिर्यादी लिपिक रवींद्र शिवाजी पाटील यास विचारणा केली असता त्याने म्हटले तुझे काय काम आहे ते सांग याचा राग येऊन त्याने त्यास मारहाण केली व ग्रामपंचायत कार्यालयातील साहित्याची फेकाफेकी केली त्यास आवरा आवर करण्यासाठी गेलेल्या विजय पाटील व गटू पाटील यांनाही त्याने धक्काबुक्की केली या प्रकरणावरून यावल पोलिसात त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे.