यावल

बिबट्याच्या हल्ल्यात 2 वर्षीय चिमुकली ठार..

यावल दि.१७ ( सुरेश पाटील )बिबट्याने एका २ वर्षाच्या मुलीला उचलून नेऊन तुकडे केल्याने संपूर्ण यावल तालुक्यात शेतकरी वर्गात, नागरिकांमध्ये,शासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,आज गुरुवार दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास डांभुर्णी शिवारामध्ये असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात असलेल्या ठेलारी समाजांतील मेंढपाळांची 2 वर्षे असलेल्या मुलीला बिबट्या पकडून घेऊन गेला असल्याचा संशय नातेवाईकांचा आहे.आणि सदरील लहान मुलीचा मृतदेह जवळील शिवारात सापडलेला असून लहान मुलीचे लचके तोडून तुकडे केलेले दिसून आले आहे.या घटनेची माहिती सर्वात प्रथम महसूल विभागाला मिळाल्याने त्यांनी वन विभागाला सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याचे विश्वसनीय वृत्त असून घटनास्थळी यावल तहसीलदार आणि यावल वनपरिक्षेत्र अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांसह उपस्थित झाले असून पुढील कार्यवाही सुरू केल्याची माहिती मिळाली.

यावल पूर्व व पश्चिम वनपरिक्षेत्र कार्यक्षेत्रात बिबट्या व वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणापासून काय काय उपाययोजना कराव्यात आणि कोणत्या प्रकारे दखल घ्यावी… याबाबत शेतकरी वर्गात सुद्धा शेतीची कामे करताना मोठ्या प्रमाणात भीती आणि दहशत निर्माण झाली असून अनेक शेतकरी आणि मजूर शेतात जाण्यासाठी नकार देत असल्याचे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे