जळगाव

पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या महागाई विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे केंद्र सरकारच्या महागाई धोरणाच्या विरोधात रस्ता रोको..

जळगाव – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर्फे रस्ता रोको आकाशवाणी चौकात करण्यात आले

सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर प्रति बॅरल 65.41 डॉलर आले आहेत यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये किमती प्रति बॅरल 63.40 डॉलर होती या कसरणीमुळे पेट्रोल आणि डिझेल शुद्धीकरणातून मिळणारे उत्पन्न ऐतिहासिक पातळीवर पोहोचलेले आहे.रेटिंग एजन्सी नुसार सध्या तेल कंपन्या पेट्रोलवर प्रति लिटर 15 ते 16 आणि डिझेलवर प्रति लिटर 6.12 रुपये नफा कमवत आहेत असे असूनही तेल कंपन्यांनी गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेल किमती कमी केलेल्या नाहीत सरकार पेट्रोल डिझेलच्या किमतीत वाढवून जनतेचे पैसे लुटत आहेत.

आंदोलनावेळी वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या

“कच्चं तेल स्वस्त, पण दरवाढ मस्त – हेच का अच्छे दिन?”

“पेट्रोलवर नफा, जनतेवर फटका – सरकारची धोरणं भटका!”

“नफा कंपन्यांना, महागाई जनतेला – हेच का ‘सबका साथ’?”

“पेट्रोल डिझेलच्या दरात घोटाळा – केंद्र सरकारचा असंवेदनशील तमाशा!”

. “नफा भरघोस, पण दरवाढ रोज – हे कुठलं धोरण?”

केंद्र सरकार हाय हाय अशा विविध घोषणा देण्यात आल्या सदर आंदोलन युवक जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व शहर जिल्हाध्यक्ष रिकू चौधरी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. सदर आंदोलनात प्रमुख उपस्थिती मा.रा.कॉं.पा.महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी,संग्रामसिंह सुर्यवंशी,सुनील माळी,अशोक पाटील,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मजहर पठाण,राजू मोरे,किरण राजपूत,आकाश हिवाळे,चेतन पवार,नामदेव वाघ,साहिल पटेल, रफीक पटेल,डॉ.राहुल उदासी,योगेश साळी,रहीम तडवी,संजय चव्हाण,मयूर पाटील,आबिद खान,अरबाज पटेल आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे