यावल

बिबट्यास जेरबंद करण्यासाठी यावल वनविभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू..

यावल – प्रादेशिक वनविभागातील वनपरिक्षेत्र यावल पश्चिम मधील महसुल भागात बिबट वन्यप्राण्याचा वावर असून यावल तालुक्यातील दिनांक १७ रोजी रात्री १२:३० ते १:०० वाजेच्या सुमारास मौजे डांभुर्णी शिवारातील प्रभाकर चौधरी यांचे मा.ग.क्र.७४१ मध्ये शेतात मेंढपाळ लोकांच्या तीन कुटुंब गेल्या ०५ दिवसापासुन वास्तवाला आहेत दरम्यान मध्य रात्रीच्या सुमारास 2 वर्षीय चिमुकली तिच्या आई सोबत झोपलेली असतांना बिबटयाने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेवून ठार केले आहे. दि.१७ रोजी तात्काळ घटनास्थळी उप वनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव, जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल, वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व व यावल वनविभाग कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली. मयत रत्ना सतीश ठेलारी हिच्या वारसास शासन निर्णयानुसार नुकसान भरपाई मिळणे बाबत कार्यवाही सुरु आहे. तसेच Swab Sample घेण्यांत आला असून नागपुर येथील फॉरेन्सिक टीम यांचेकडे पाठविण्याची देखील कार्यवाही सुरु आहे.

गेल्या महिन्या भरात बिबट्याच्या हल्ल्याची ही दुसरी घटना यावल तालुक्यात घडल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट वावर क्षेत्रात वनपरिक्षेत्र अधिकारी यावल पश्चिम व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सदर भागात ट्रॅप कॅमेरे लावून Thermal Drone व इतर ड्रोन कॅमे-याव्दारे निरीक्षण सुरु आहे. बिबट वन्यप्राण्याचे निरीक्षण, ट्रॅकिंग व कॅमेरा ट्रॅपिंग तसेच आजु बाजुच्या गाव परिसरात दवंडी देऊन लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन करुन गस्त करीत आहे. सदर ठिकाणी RRT Team काम करीत आहेत तसेच नाशिक येथील RESQ टीम ला देखील पाचारण करण्यांत येत आहे. सदर भागात बिबट्याचा शोध घेवून व बिबट जेरबंद करण्यासाठी जळगांव वनविभागातील RRT Team ची सेवा उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. तसेच रविंद्र फालक, मानद वन्यजीव रक्षक जळगाव यांची देखील मदत घेण्यांत येत आहे.

तसेच वनपरिक्षेत्र यावल अधिकारी व कर्मचारी यांनी मनुष्यहानी झालेल्या ठिकाणापासुन आजु बाजुच्या गाव परिसरात लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून यावल वनविभागाकडून बिबटयास जेरबंद करण्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

अशी माहिती उपवनसंरक्षक यावल वनविभाग यांनी पाठवलेल्या प्रेस नोट मधून दिली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे