ब्रेकिंगयावल

अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद..

यावल दि.१८ (सुरेश पाटील) – दोन वर्षाच्या मुलीला  ठार करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यावल वनविभागाला यश आले.

यावल – वन विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार नमूद केले आहे की,यावल येथील बिबटया जेरबंद यावल तालुक्यातील दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री १२:३० ते १:०० वाजेच्या सुमारास मौजे डांभुर्णी शिवारातील प्रभाकर चौधरी यांचे मा.ग.क्र. ७४१ मध्ये शेतात मध्य रात्रीच्या सुमारास कु.रत्ना सतीश ठेलारी वय ०२ ही तिच्या आई सोबत झोपलेली असतांना बिबटयाने झडप घालून केळीच्या बागेत ओढत नेवून ठार केले होते.गेल्या महिन्या भरात बिबटयाच्या हल्ल्याची ही दुसरी घटना यावल तालुक्यात घडल्याने परिसरातील शेतकरी व मजुरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असल्याने उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव जमीर शेख, यांच्या मार्गदर्शनाखाली  यावल वनविभाग कर्मचारी यांच्या उपस्थितीत ज्या भागात दि.१७ एप्रिल २०२५ रोजी रात्री चिमुरडीला ठार मारले होते त्या भागात चार पिंजरे लावण्यांत आले.रविंद्र फालक,मानद वन्यजीव रक्षक जळगांव व अमन गुजर यांच्या सहकार्याने डॉ.यश सागर, पशुवैदयकीय अधिकारी TTC Jalgaon व वनपाल गणेश गवळी ( शुटर ) यांना पिंज-यात बसविण्यांत आले. रात्री ९:०० वाजेच्या सुमारास त्या भागात बिबटया पोहोचला. वनपाल गणेश गवळी (शुटर) यांनी बिबटयावर अचुक नेम साधत बेशुध्दीचे इंजेक्शन मारले नंतर काही अंतरावर बिबटया गवतामध्ये बेशुध्द झाला. त्याचा Thermal Drone च्या सहय्याने शोध घेवून लागलीच त्या बिबटयाला पिंज-यात जेरबंद करण्यांत आले.

सदर बिबट्याला पुढील वैदयकीय चाचण्याअंती त्याला नागपुर येथे पाठविण्याची कार्यवाही सुरु आहे.अथक परिश्रमानंतर बिबटयाला जेरबंद करण्यांत वन विभागाला यश आले,दरम्यान अशा घटना जिथे घडतात तेथे नागरीकांचे सहकार्य खूप महत्वाचे असते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे