यावल – विरावली रस्त्यांवर स्कूल बस व दुचाकीचा भीषण अपघात..

यावल दि.२० – यावल तालुक्यात आज सकाळी विरावली रस्त्यावर तालुका कृषी कार्यालयाजवळ भीषण अपघाताची घटना घडली त्यात कोरपावली येथील निशा जितेंद्र येवले आणि विशाल कुशल येवले हे दोघं काकु पुतण्या एम.पी.०७ एन पी ३०७२ या दुचाकीवरून यावलच्या दिशेने जात असताना, कृषी फलोत्पादन केंद्राजवळ त्यांच्या दुचाकीची समोरून येणाऱ्या एमएच १९ जे ७१९८ या स्कूल बसची जोरदार धडक झाली. या अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
कुशल डीएच जैन विद्यालयातील विद्यार्थी असून तो नुकताच ६०,% गुण मिळवून दहावी उत्तीर्ण झाला होता अपघाताचे ठिकाण हे खड्डेमय आणि वळणाचे असल्याने वाहन चालकांचा ताबा सुटण्याची शक्यता असून, यामुळेच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.सदर घटना अपघाताची माहिती मिळाल्याबरोबर गावातील राकेश महाजन,भाजपाचे कार्यकर्ते राकेश फेगडे,उमेश जावळे, विरावली पोलिस पाटील यांच्या सह अनेक नागरिकांनी मदत कार्य केले, शविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले,एका वेळेसअंतिम संस्कार करण्यात आला नाही कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला .