1 ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर 2025 जागतिक बेघर दिन सप्ताह उत्साहात साजरा..

जळगाव – शहर महानगरपालिका जळगाव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्र येथे जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे अति.उपायुक्त निर्मला गायकवाड उपायुक्त धनश्री शिंदे उपायुक्त पंकज गोसावी सर शहराध्यान व्यवस्थापक गायत्री पाटील मनपा संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचालक प्रशांत जी गायकवाड यांच्या मार्गदर्शनानुसार 1ऑक्टोंबर ते 10 ऑक्टोंबर जागतिक बेघर दिन सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
1 ऑक्टोंबर 2025 ज्येष्ठ नागरिक दिवस
2 ऑक्टोंबर 2025 गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
3 व 4 ऑक्टोंबर 2025 संपूर्ण बेघर निवारा केंद्रात साफसफाई स्वच्छता करण्यात आली.
5 व 6 ऑक्टोंबर 2025 जागतिक बेगर दिन सप्ताह निमित्त बेघर लाभार्थ्यांचे विविध भागात जाऊन सर्वेक्षण करण्यात आले.
7 व 8 ऑक्टोंबर 2025 लिंबू चमचा संगीत खुर्ची सांस्कृतिक कार्यक्रम दांडिया अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
8 ऑक्टोंबर 2025 संजय गांधी योजना व विविध शासकीय योजनांची लाभार्थ्यांना माहिती देण्यात आली.
9 ऑक्टोंबर 2025 संपूर्ण निवारा केंद्रात निजंतुकीकरण करण्यात आले.
9 ऑक्टोंबर 2025 लाभार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर व औषधोपचार करण्यात आले.
10 ऑक्टोंबर 2025 जागतिक बेघर दिवसानिमित्त फुगे पताका लावून केक कापून आनंद नगरी चे आयोजन उत्साहात आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे सर जळगाव शहर महानगरपालिका यांच्या हस्ते संपन्न झाले. व लाभार्थी संत गाडगे बाबा शहरी बेघर निवारा केंद्र चे व्यवस्थापक मनोज कुलकर्णी काळजी वाहक राजेंद्र मराठे हर्षल वंजारी शितल काटे किरण मोरे यांचे सहकार्य लाभले.