जळगाव

अट्टल खिसेकापू टोळीला जळगाव बसस्थानकातून अटक : LCB ची कारवाई..

जळगाव – शहरातील गर्दीच्या भागांमध्ये वारंवार खिसे कापून होणाऱ्या चोरींच्या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. अमरावती येथील तीन खिसेकापू चोरट्यांना बसस्थानक परिसरातून रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि.२५ जून रोजी पोलीस हवालदार प्रविण भालेराव व अक्रम शेख यांना अमरावती येथील खिसेकापू टोळी जळगाव बसस्थानकात आल्याची माहिती मिळाली. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे देण्यात आली. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तत्काळ बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग सुरू केले.पथकाने बसस्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना गर्दीत संधी साधून फिरणाऱ्या तीन संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी आपली नावे पुढीलप्रमाणे सांगितली: 1.अहमद बेग कादर बेग (६२), रा. मुजफ्फरपुरा, नागपुरी गेट, अमरावती 2. हफिज शाह हबीब शाह (४९), रा. बलगाव, सकीनगर, अमरावती.3. अजहर हुसेन हफर हुसेन (४९), रा. रहमत नगर, अमरावती चौकशीदरम्यान त्यांनी २४ जून रोजी बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून दोन बंडलमध्ये एकूण ₹२००० चोरी केल्याची कबुली दिली.आरोपींची अंगझडती घेतली असता खालील मुद्देमाल सापडला:₹३३,८३०/- रोख रक्कम,₹१७,५००/- किंमतीचे ५ मोबाईल,०१ रेक्झिन बॅग ,₹५,००,०००/- किंमतीची टाटा इंडिका व्हिस्टा कार,एकूण ₹५,५१,५३०/-मुद्देमाल जप्त.

सदर प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी सध्या जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी, विशेषतः बस स्थानक, रेल्वे स्थानक व इतर सार्वजनिक वाहतूक स्थळांवर सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती दिसल्यास टोल फ्री क्रमांक 112 वर तात्काळ माहिती द्यावी, असे त्यांनी सांगितले.

सदर कारवाई  डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पोउनि. शरद बागल, पोहेका सुनील दामोदरे, पोहेकॉ अक्रम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, पोना किशोर पाटील, पोकॉ रविंद्र कापडणे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे