हातभटटी दारु निर्मिती व विक्रीकेंद्रा विरुद्ध पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त मोहीम..

जळगाव – जिल्हयात विविध ठिकाणी अवैध हातभटटी निर्मिती व विक्री होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधीकारी जळगाव यांच्या कडे प्राप्त झालेल्या असल्याने त्यांनी पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना संयुक्त मोहीम राबवण्याबाबत आदेश केल्याच्या अनुषंगाने दिनांक. ०९ रोजी पोलिस विभाग व राज्य उत्पादन शुल्क विभाग यांनी एकत्रीतपणे संपुर्ण जळगाव जिल्हयात धाड सत्र आयोजित करुन एकुण १३४ गुन्हे नोंदवले. सदर मोहीमे मध्ये ३३८५ लिटर गावठी दारु व २०१५० लिटर रसायन (कच्ची हातभटटी दारु) जप्त करण्यात आला. सदर मुददेमालाची एकुण किंमत रुपये १४,४८,६६२ इतकी आहे.

सदर मोहीमेत पोलिस विभागातर्फे सर्व पोलिस स्टेशन अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून एकुण ९९ गुन्हे नोंदवले असुन त्यामध्ये २८४५ लिटर हातभटटी दारु व ५६३० लिटर रसायन यांचा समावेश असुन एकुण मुददेमालाची किंमत रुपये ६,१२,३८२ इतकी आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे सर्व अधीकारी व कर्मचारी यांनी संयुक्त मोहीमेत सहभाग नोंदवुन एकुण ३५ गुन्हे नोंदविले असुन ५४० लिटर गावठी दारु व १४५२० लिटर रसायन तसेच अवैध दारु वाहतुक करणारे एक चार चाकी वाहन असा एकुण ८,३६, २८० रुपये किंमतीचा मुददेमाल आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक व्ही.टी.भुकन, अशोक तारु निरीक्षक भरारी पथक मोमीम निरीक्षक चोपडा किशोर गायकवाड निरीक्षक चाळीसगाव, राठोड निरीक्षक भुसावळ तसेच जळगाव जिल्हयातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व अधीकारी व जवान संवर्गीय कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
ईतर महत्वाच्या बातम्या :
36 हजाराची लाच भोवली : मुख्याध्यापिके सह लिपिक धुळे ACB च्या जाळ्यात..
8 हजाराची लाच : मोडाळा व चोरवडचे दोघ वनपाल ACB च्या जाळ्यात..