5 हजाराची लाच : अधिक्षक अभियंता ACB च्या जाळ्यात..

भुसावळ : दिपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या अधिक्षक अभियंत्यास 5हजाराची लाच भोवली. बिल मंजूर करण्यासाठी 5 हजार लाच मागितल्याप्रकरणी भानुदास पुंडलीक लाडवंजारी, अधिक्षक अभियंता औष्णिक विद्युत केंद दिपनगर, ता. भुसावळ जि. जळगांव खाते महाराष्ट्र राज्य विज निर्माती कंपनी दिपनगर, भुसावळ वर्ग-०१ यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार हे एका कंपनीतर्फे दिपनगर औष्णीक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेच्या पॉवर प्लांटच्या ठिकाणी साईट सुपरवायजर म्हणून कामास होते. सदर कंपनी तर्फे दि.२८.११.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ दरम्यान २१० मेगावॅट पॉवर प्लाटंच्या तळाशी जमा होणारी सख उचलण्यासाठी, मोडतोड आणि तेलाचे बरेल काढण्यासाठी तसेच वाहतुक करण्यासाठी करण्यात आलेल्या कामाचे २,२८,५४४/- रुपयांचे बिल मंजुरीसाठी मुख्य अभियंता, बी.टी.पी.एस विभाग, दिपनगर यांच्याकडे पाठविले होते. सदरचे बिल मंजुर करुन देण्याचे मोबदल्यात भानुदास पुंडलीक लाडवंजारी, अधिक्षक अभियंता यांनी तकारदार यांचेकडे एकुण २,२८,५४४/- रुपये बिलाच्या ५ टक्केप्रमाणे लाचेची मागणी फरुन तडजोडीअंती ५०००/- रुपयांची लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने दि.२९.०४.२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव तक्रार लिहुन दिली होती.
सदर लाचमागणी तकारीची दि.२९.०४.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील भानुदास पुंडलीक लाडवंजारी, अधिक्षक अभियंता यांनी सदर कंपनीतर्फे दि.२८.११.२०२४ ते दि.२८.०२.२०२५ दरम्यान करण्यात आलेल्या कामाचे एकुण २,२८,५४४/- रुपये बिलाच्या ५ टक्केप्रमाणे लाचेची मागणी करुन तडजोडीअंती ५०००/- रुपयांची लाचेची मागणी करुन, सदर लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शवुन लाच मिळवण्याचा प्रयत्न करुन, स्वतःसाठी भ्रष्ट व बेकायदेशीर मागनि पैशांच्या स्वरूपात लाभ मिळविण्याची व्यवस्था करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केले, म्हणुन गुन्हा दाखल.
सदर कारवाई
एसीबी चे पोलिस उप अधिक्षक,योगेश ठाकूर,हेमंत नागरे, पोलिस निरीक्षक,पो हेकों/किशोर महाजन, पोना/बाळु मराठे, पोशि/अमोल सुर्यवंशी, पोशि/प्रणेश ठाकूर, पोशि भुषण पाटील यांनी केली.