जळगाव
राष्ट्रीय क्रीडा दिवस मनपा शिक्षण विभागातर्फे उत्साह पूर्वक साजरा…

जळगाव – राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्ताने दि.३०/०८/२०२५ शनिवार रोजी महानगर पालिका जळगाव व मनपा शिक्षण विभाग जळगाव तर्फे आयोजित क्रीडा स्पर्धामध्ये फक्त एकाच दिवसात त्यारी करून मनपा शाळेतील शिक्षकांनी मेहेनत घेऊन एकूण – ८ खेळ प्रकारात तब्ब्ल ३०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला..या स्पर्धेत विजयी व सहभागी सर्व विद्यार्थी मित्रांना प्रोत्साहित करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मा.श्री सुनील गोराने साहेब, मनपा नगर सचिव, मा. श्री. दिनानाथ भामरे, क्रीडा अधिकारी मनपा जळगाव, मा. श्री. खलील शेख,प्रशासन अधिकारी मनपा जळगाव, केंद्र प्रमुख,क्रीडा शिक्षक,मनपा शाळांचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक तसेच मनपा शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते..