जळगाव एमआयडीसीत ठिबक कंपनीला भीषण आग : लाखोंचे साहित्य जळून खाक..

जळगाव – एमआयडीसी k – सेक्टर मध्ये साई किसान ठिबक कंपनीला रात्री 9:30 वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. लागलेल्या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी महानगरपालिकेच्या 4 भुसावळ नगरपालिकेचा एक आणि नशिराबाद येथील 1 अशा एकूण सहा बंबांनी आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते.
साई किसन ठिबक कंपनीला नऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या या भीषण आगीत कंपनीचे उत्पादित साहित्य, मशिनरी जळून खाक झाल्या. आग कोणत्या कारणामुळे लागली याचे अद्याप कारण कळू शकले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्ट सर्किटने लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आग विझविण्यासाठी घटनास्थळी महानगरपालिकेचे 4 बंब भुसावळ पालिकेचा 1 आणि नशिराबाद पालिकेचा 1 बंब घटना स्थळी दाखल झाले होते अग्निशामन कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच घटनास्थळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते. या आगीमुळे मोठे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.