राजकीय

न्हावी, मारुळ भागात उमेदवार श्रीराम पाटील याचे मतदारांनी केले स्वागत..

सहकारमहर्षी जे टी महाजन यांचा आदर्श घेऊन काम करणार : श्रीराम पाटील 

प्रतिनिधी / फैजपूर – यावल तालुक्यातील न्हावी येथे माजी गृहराज्यमंत्री दादासाहेब जे टी महाजन यांच्या पुतळ्यास महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत प्रचारस सुरुवात केली. यावेळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी करीत श्रीराम पाटील यांना विजयी करण्याचे आश्वासन दिले. रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष चौधरी, यावलचे माजी आमदार रमेश चौधरी उपस्थित होते.

रावेर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने यावल तालुक्यात न्हावी येथे प्रचार दौऱ्यात ग्रामस्थांच्या भेटी घेत मतदारांशी संवाद साधला. नागरिकांचे प्रश्न यावेळी एकूण घेत सहकारमहर्षी दादासाहेब स्व जे टी महाजन यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण भावी काळात काम करू असे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले. यावेळी लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील , माजी जि. प सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे , यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे फैजपूर शहराध्यक्ष अनवर खाटीक , काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष रियाज भाई, न्हावीचे सरपंच देवेंद्र चोपडे, उपसरपंच नदीम पिंजारी , विलास चौधरी, भानुदास चोपडे , वामन तायडे, मधुकर झोपे, सरफराज तडवी, वामन तायडे , चेतन झोपे , देवेंद्र चौधरी, चेतन इंगळे, सोनू झोपे यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे