जळगाव
आमदार सत्यजित तांबे यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता टीका..
जळगाव – जिल्ह्यातील दौरा हा मुख्यत्वे पर्यटनात काही सुधारणा व्हाव्या म्हणून आहे. आज आपल्याकडे अजिंठा आहे, शून्याचा शोध लागला असे भास्कराचार्य याचे पाटणा येथे ठिकाण आहे. सरकारने घोषणा केली होती की, पाटणा देवी येथे शून्याचा शोध लागला म्हणून गणित नगरी तयार करू मात्र अजून हा विषय कागदावर देखील आलेला नाही.
अयोध्या येथे राम मंदिर तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी विमान तळाला महर्षी वाल्मीकीचे नाव देण्यात आले. मात्र चाळीसगाव मध्ये त्यांचा जन्म झाला आहे. त्याची ब्रिटिश कालीन नोंद आहे. मात्र त्यांच्या जन्मास्थळी काही पर्यटन करता येईल का? हा माझा उदेश असल्याची टीका पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली आहे.