शासनाने भरडधान्य,ज्वारी खरेदी केली परंतु शेतकऱ्यांचे ३ कोटी कधी देणार..?
जिल्हा पुरवठा विभागामुळे शेतकरी अडचणीत येत आहे का?

यावल दि.२७ ( सुरेश पाटील ) मार्च २०२५ महिन्यात यावल तालुक्यात शासनातर्फे अंदाजे ८ ते साडेआठ हजार क्विंटल ज्वारी खरेदी केली आहे या ज्वारीचे अंदाजे दोन ते तीन कोटी रुपये रक्कम शासनाने शेतकऱ्यांना न दिल्याने तसेच जळगाव जिल्हा पुरवठा शाखेने शेतकऱ्यांना रक्कम मिळवून देण्याबाबत शासन दरबारी कोणतेही प्रयत्न करतांना दिसून येत नाही.पुरवठा विभाग ढिसाळ कारभारामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे शासन इतर योजना राबवून आर्थिक अडचणीत आल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाची हक्काची रक्कम देत नसल्याचे जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत चौधरी यांनी शासनाच्या आर्थिक कारभाराबाबत तीव्र खंत व्यक्त केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल तालुक्यात कोरपावली येथील विविध कार्यकारी सोसायटी तर्फे शासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांची अंदाजे आठ ते साडेआठ हजार क्विंटल ज्वारी खरेदी केली आहे या ज्वारी खरेदीची अंदाजे दोन ते तीन कोटी रुपयाची रक्कम शासनाने जळगाव जिल्हा पुरवठा विभागामार्फत दिलेली नाही जिल्हा पुरवठा विभागाने शासन दरबारी काय प्रयत्न केले किंवा जिल्ह्यातील दमदार नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्याकडे शेतकऱ्यांना त्यांची हक्काची रक्कम मिळणे संदर्भात काय पाठपुरावा केला याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून पुरवठा विभाग जाणून बुजून शेतकऱ्यांना आर्थिक रक्कम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत नाही का..? किंवा पुरवठा विभागाने संबंधितांकडून काही अपेक्षा ठेवून कुटिल षडयंत्र रचले आहे का..? इत्यादी अनेक प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत असले तरी शासनाने इतर अनावश्यक योजनांना कात्री लावून शेतकऱ्यांची थकबाकी आधी पूर्ण करायला पाहिजे परंतु शासन तसे करीत नसल्याने यावल तालुक्यातील जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रशांत चौधरी यांनी शासनाच्या आर्थिक कारभाराविषयी तीव्र खंत व्यक्त केली आहे.