
जळगाव – महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारा निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज जळगावात येत आहेत.या प्रचाराचा मुख्य भाग म्हणून आज रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरात भव्य रोड शो आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून जळगावच्या राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

हा भव्य रोड शो उद्या दुपारी ठीक ३ वाजता शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरू होणार आहे. येथून हा ताफा नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक आणि व्यापारी केंद्र असलेल्या गोलाणी मार्केट मार्गे मार्गक्रमण करेल. यानंतर रोड शोची सांगता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथेच होईल. या संपूर्ण मार्गावर मुख्यमंत्री फडणवीस जनतेशी संवाद साधणार असून महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करणार आहेत.मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या निमित्ताने महायुतीकडून मोठे शक्तीप्रदर्शन केले जाणार.