महाराष्ट्र

रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. अनिकेत निकम थेट पोहोचले पोलीस ठाण्यात; पीडिताला दिला मोठा आधार!

जळगाव | प्रतिनिधी : सर्वसामान्य कष्टकरी नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ तथा ‘न्याय विश्वास फाउंडेशन’चे संस्थापक ॲड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी एका पीडित रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मारहाण आणि बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप असलेल्या रिक्षाचालकाची बाजू मांडण्यासाठी ॲड. निकम यांनी थेट जळगाव शहर पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या या भूमिकेमुळे पीडित रिक्षाचालकाला मोठा मानसिक आधार मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ नोव्हेंबर २०२६ रोजी शहरात गजानन माळी या रिक्षाचालकाला एका कारचालकाने मारहाण केल्याची घटना घडली होती. संबंधित कारचालकाने बंदूक दाखवून धमकावल्याचाही आरोप रिक्षाचालकाने केला आहे. या घटनेप्रकरणी तक्रार करूनही अपेक्षित दखल घेतली जात नसल्याची भावना पीडित रिक्षाचालकाने व्यक्त केली. संबंधित कारचालक मोठा शासकीय अधिकारी असल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे हताश झालेल्या रिक्षाचालकाने न्यायासाठी ॲड. अनिकेत निकम यांच्याकडे मदतीची मागणी केली.

रिक्षाचालकाची व्यथा समजून घेत ॲड. निकम यांनी केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता स्वतः पीडिताला सोबत घेत जळगाव शहर पोलीस ठाणे गाठले. यावेळी त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच पीडित रिक्षाचालकाची तक्रार गांभीर्याने घेऊन त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

दोषींवर कठोर कारवाईचे पोलिसांचे आश्वासन

ॲड. निकम यांनी मांडलेल्या प्रकरणाची दखल घेत पोलीस प्रशासनाने या घटनेचा तातडीने तपास करून दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात आले.

सर्वसामान्य कष्टकरी माणसावर अन्याय होत असताना त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी असल्याचे ॲड. अनिकेत निकम यांच्या या कृतीतून दिसून आले. एका रिक्षाचालकाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार सध्या चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या 

जळगाव जिल्ह्याला सकाळी ९ वाजून १६ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के..

डम्पिंग ग्राउंडच्या कामाला गती द्या, अन्यथा कचरा येऊ देणार नाही : उपमहापौर मनोज चौधरींचा ठेकेदाराला कडक इशारा..

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे