क्रिडा व मनोरंजन

थायलंडमध्ये “आंतरराष्ट्रीय एअर रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026” मध्ये चाळीसगावच्या कल्पेश महालेंनी भारतासाठी सुवर्णपदक पटकावले..


चाळीसगाव | प्रतिनिधी – चाळीसगाव शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी उल्लेखनीय कामगिरी येथील युवा नेमबाज कल्पेश विजय महाले यांनी केली आहे. नुकत्याच थायलंडची राजधानी बँकॉक येथे दिनांक ४ मे ते ७ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या “भारत विरुद्ध थायलंड इंटरनॅशनल एअर रायफल शूटिंग चॅम्पियनशिप 2026” स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत त्यांनी पुरुष (मास्टर) ओपन गटात सुवर्णपदकावर नाव कोरले.

अत्यंत चुरशीच्या आणि उच्चस्तरीय या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कल्पेश महाले यांनी अचूक नेमबाजीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली. त्यांच्या या यशामुळे चाळीसगावसह संपूर्ण जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

कल्पेश यांच्या या यशामागे त्यांची मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्द महत्त्वाची ठरली. त्यांना प्रशिक्षक लवकुमार जाधव व विशाल सोलंखी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, चाळीसगावकरांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे