जळगाव जिल्ह्यात पोलिसांची नाकाबंदी मोहीम : ३९९ वाहनचालकांवर कारवाई..

जळगाव : आगामी कायदा व सुव्यवस्था तसेच मालमत्तेविषयक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा पोलिसांनी दि. ८ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत जिल्हाभर विशेष नाकाबंदी मोहीम राबवली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच विविध शाखांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

नाकाबंदी मोहिमेत एकूण ३९ पोलीस अधिकारी व १९२ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेत विविध ठिकाणी वाहनांची तपासणी केली. या कारवाईदरम्यान मोटार वाहन कायद्यान्वये एकूण ३९९ केसेस करण्यात आल्या असून ३ लाख ५८ हजार २५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
कारवाई बाबत सविस्तर —
फॅन्सी नंबर प्लेट : ४४ केसेस
विनानंबर प्लेट वाहने : ७८ केसेस
ट्रिपल सीट प्रवास : १०६ केसेस
विनालायसन्स वाहनचालक : ९४ केसेस
ड्रंक अँड ड्राईव्ह : ८ केसेस
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच वाहतूक नियमांचे पालन व्हावे यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.