जळगाव

मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचा आज १० मे रोजी समारोप..

जळगाव, (प्रतिनिधी) – जळगावातील शिरसोली रोडवरील गौराई ग्रामोद्योगच्या भव्य दालनात ‘मँगो फिएस्टा-२०२६’ या आंबा प्रदर्शनाचे उद्घाटन जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते ७ मे रोजी उत्साहात झाले. तब्बल १६० जातींच्या आंब्यांची मांडणी असलेल्या या प्रदर्शनास नागरीकांकडून उत्तम प्रतिसाद लाभत असल्याने हे प्रदर्शन आता एक दिवसांनी वाढवण्यात आलेले आहे. हे प्रदर्शन नागरिकांसाठी आज १० मे रोजी देखील सकाळी ९ वाजेपासून खुले असणार आहे.

आंब्यांच्या विविधतेचा अनोखा अनुभव देणारे हे प्रदर्शन जळगावकरांसाठी औत्सुक्याचे ठरले आहे. आंबा संशोधनातील जैन इरिगेशनचे योगदान अधोरेखित करणारे हे प्रदर्शन सर्वसामान्यांना परिचय करून देते. स्थानिक तसेच विदेशी आंब्यांच्या दुर्मीळ जाती एकाच छताखाली पाहण्याची संधी नागरिकांना मिळाल्यामुळे आंब्याविषयी अधिकची माहिती भेट देणाऱ्यांना मिळाली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार हे प्रदर्शन 1 दिवसाने वाढविले आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे