जळगाव

पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यावरील दोन पोलीस निलंबित :  कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्या प्रकरणी कारवाई..

गार्ड ड्युटीवर गैरहजर : ३ एसएलआर रायफल गार्ड रूम मध्ये बेवारस अवस्थेत पडून..

जळगाव : पोलीस मुख्यालय, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या दोन पोलीस अंमलदारांना कर्तव्यात गंभीर निष्काळजीपणा आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी तातडीने निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी यासंदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ८ मे २०२६ रोजी रात्री ९:२० वाजता राखीव पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षक बंगल्यावरील गार्ड ड्युटीचे अचानक निरीक्षण केले. यावेळी गार्ड ड्युटीवर नियुक्त असलेले सफौ/१३७८ संभाजी निबाजी पाटील आणि पोना/३९३ प्रदीप भगतसिंग राजपूत हे दोघेही आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी अनुपस्थित आढळून आले.

तपासणीदरम्यान आणखी धक्कादायक बाब समोर आली. गार्ड रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ३ एस.एल.आर. रायफल (बट नं. ८२.२६२.८८२) या विना दारूगोळा आणि कोणतीही सुरक्षा न ठेवता बेवारस अवस्थेत पडून असल्याचे निदर्शनास आले.संवेदनशील ठिकाणी ड्युटीवर असताना गैरहजर राहणे तसेच शस्त्रास्त्रांच्या सुरक्षेबाबत गंभीर हलगर्जीपणा करणे हे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तवणूक) नियम १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी दोन्ही अंमलदारांना शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पोलीस मुख्यालय, जळगाव येथेच राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास त्यांना मनाई करण्यात आली आहे.

या कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, कर्तव्यातील निष्काळजीपणाबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

ईतर महत्वाच्या बातम्या 

5 लाखाची लाच : सार्वजनिक बांधकाम विभागाचा शाखा अभियंता ACB च्या जाळ्यात..

IPL क्रिकेट सट्ट्यावर एलसीबीची धाड : 10.53 लाखांचा मुद्देमाल जप्त..

M J कॉलेज परिसरातील ३ सायबर कॅफेंवर पोलिसांचा छापा; कॅफे चालक आणि मालकांविरुद्ध गुन्हे दाखल..

 

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे