जळगाव

ACB ने सील केलेल्या लाचखोर मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न : दोघांना अटक, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न ?

जळगाव – लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सील केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या घरात घुसून कुलूप तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जळगाव पोलिसांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, किरण पुरुषोत्तम चौधरी, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) यांच्याविरुद्ध अकोला येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत ट्रॅप कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या जळगाव येथील साईप्रभा आर्केड, गणेश कॉलनीतील निवासस्थानी संभाव्य घरझडतीच्या अनुषंगाने एसीबी जळगावने घर सीलबंद केले होते.

दरम्यान, शनिवारी रात्री सीलबंद घरातून आवाज येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी एसीबीच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घराच्या मागील बाजूने शिडी लावून आत प्रवेश केलेल्या दोन संशयितांना पोलिसांनी जागीच पकडले.

अटक करण्यात आलेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत – प्रसाद वसंत नारखेडे (वय ३३, रा. डांभुर्णी, ता. यावल), प्रविण अशोक महाजन (वय ३६, रा. गणेश कॉलनी, जळगाव)या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. २०७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ), ३३१(२), २३८ व ६२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी सीलबंद घराचे चॅनल गेटचे कुलूप तोडून अनधिकृत प्रवेश केला. घरातील मौल्यवान वस्तू किंवा संभाव्य पुरावे चोरी करून घरझडतीपूर्वी हटविण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा हेतू असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.

तपासातील महत्त्वाचे प्रश्न

या घटनेनंतर तपास यंत्रणेसमोर काही महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत:

या घरफोडीच्या प्रयत्नामागे संबंधित लोकसेवकाचा कोणताही सहभाग होता का? घरातील रोकड, कागदपत्रे किंवा इतर मौल्यवान वस्तू एसीबीच्या ताब्यात येण्यापूर्वी हटविण्याचा कट होता का? अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींचा संबंधित अधिकाऱ्याशी नेमका काय संबंध आहे?

या सर्व बाबींचा जळगाव पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सखोल तपास सुरू आहे. तपास पूर्ण होईपर्यंत या प्रश्नांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, पुढील तपासानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे