जळगाव

आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र महिनाभरात बंद होणार..टीबी सेंटर येथील नवीन केंद्राचे ९५ टक्के काम पूर्ण : उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांची पाहणी

जळगाव : गव्हर्मेंट आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका महिन्याच्या मुदतीत बंद करून ते टीबी सेंटर येथील नवीन कचरा संकलन डेपोत स्थलांतरित करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी गुरुवारी टीबी सेंटर येथील सुरू असलेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला

काही दिवसांपूर्वी एबीव्हीपीसह गव्हर्मेंट आयटीआयच्या विद्यार्थ्यांनी आयटीआयजवळील कचरा डेपो हटविण्याची मागणी केली होती. त्यावेळी मनपा आयुक्त आदित्य जीवने, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी विद्यार्थ्यांना महिनाभरात सदर कचरा केंद्र बंद करण्याचे आश्वासन दिले होते.दिलेल्या आश्वासनानुसार टीबी सेंटर येथील प्रस्तावित कचरा संकलन केंद्राच्या कामाची पाहणी करण्यात आली. सध्या या केंद्राचे सुमारे ९५ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित पाच टक्के काम येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित मक्तेदाराचे अभियंता व मनपा अभियंत्यांनी दिली.

या कामाचा सविस्तर आढावा मनपा आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत घेण्यात येणार आहे. त्यानंतर आयटीआयजवळील कचरा संकलन केंद्र पूर्णपणे बंद करून टीबी सेंटर येथून कचरा संकलन प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती उपमहापौर मनोज चौधरी व स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर मनपा प्रशासन व पदाधिकारी कोणतीही तडजोड करणार नसल्याचेही यावेळी त्यांनी स्पष्ट केले.पाहणीवेळी प्रकल्प प्रमुख योगेश वाणी, संबंधित ठेकेदारांचे अभियंते तसेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूटचे पीएमसी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे