ब्रेकिंग

यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तेत फेरबदल; सभापती, उपसभापतींचे राजीनामे..

सभापतीपदासाठी उमेश पाटील, तर उपसभापतीपदासाठी पंकज चौधरी यांची नावे चर्चेत : ४ नोव्हेंबरला होणार निवड

यावल (प्रतिनिधी) : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून, विद्यमान सभापती उज्जैनसिंग भाऊलाल राजपूत आणि उपसभापती दीपक दिनकर चौधरी यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता बाजार समितीच्या नव्या सभापती आणि उपसभापतींच्या निवडीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नव्या सभापतीपदासाठी भाजपचे संचालक उमेश प्रभाकर पाटील, तर उपसभापतीपदासाठी पंकज दिनकर चौधरी यांची नावे आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या नावांवर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नसून, पक्षांतर्गत बैठकीत अंतिम निर्णय होणार आहे.यावल कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाच्या महायुतीचे बहुमत आहे. महायुतीमध्ये ठरलेल्या अंतर्गत समझोत्यानुसार बाजार समितीच्या सर्व संचालकांना सभापतीपदाचा सन्मान मिळावा, या भूमिकेतून विद्यमान सभापती उज्जैनसिंग राजपूत आणि उपसभापती दीपक चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिल्याचे समजते. येत्या ४ नोव्हेंबर रोजी बाजार समितीच्या सभागृहात नवीन सभापती व उपसभापतींची निवड होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या १९ संचालकांचे बहुमत निर्णायक ठरणार आहे. सभापतीपदासाठी उमेश प्रभाकर पाटील आणि उपसभापतीपदासाठी पंकज दिनकर चौधरी यांची नावे सर्वाधिक चर्चेत आहेत.मात्र, या पदांसाठी सागर राजेंद्र महाजन आणि कांचन ताराचंद फालक यांच्या नावांचीही चर्चा सुरू असल्याने निवडीबाबत उत्सुकता वाढली आहे.

दरम्यान, आज सायंकाळी आमदार अमोल जावळे यांच्या उपस्थितीत पक्षाचे पदाधिकारी आणि संचालक मंडळाची बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत सभापती व उपसभापती पदाच्या उमेदवारांच्या नावांवर अंतिम निर्णय होऊन शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडीत सभापतीपदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडते आणि उपसभापतीपदी कोणाची वर्णी लागते, याकडे यावल तालुक्याचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे