जेडीसीसी निवडणुकीत यावल सोसायटी मतदार संघातून अतुल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल

यावल( प्रतिनिधी ) : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी यावल सोसायटी मतदार संघातून माजी नगराध्यक्ष अतुल वसंतराव पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे त्यांनी हा अर्ज सादर केला. त्यांच्या उमेदवारी अर्जास सूचक म्हणून विरावली येथील सतीश रघुनाथ पाटील तर अनुमोदक म्हणून कासवा येथील मीराबाई संजय सपकाळे हे आहेत.नामांकन दाखल करतेवेळी यावल नगरीच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा छायाताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेचे ॲड.देवकांत पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष राकेश सोनार,गोलू माळी आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावल सोसायटी मतदार संघातून अतुल पाटील यांच्या उमेदवारीमुळे जिल्हा बँक निवडणुकीत चुरस वाढणार असून,त्यांच्या उमेदवारी कडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.