ब्रेकिंग

पहूर येथे १७ ऑक्टोबर रोजी डॉ. अशोक ऊईके व गिरीष महाजन यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा..

यावल ( प्रतिनिधी ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभाग यावल व्दारे सेवा संकल्प अभियानांतर्गत पहूर येथे १७ ऑक्टोबर शनिवार रोजी भव्य ‘आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा’ संपन्न होणार कार्यक्रम भव्य आदिवासी लाभार्थी मार्गदर्शन मेळावा’अभियान महाराष्ट्र शासन,आदिवासी विकास विभाग आणि ITDP, यावल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत, तडवी-भिल्ल समाजाच्या विकास योजनांसाठी

दिनांक व वेळ:शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६ रोजीसकाळी ११ वाजता ठिकाण: माळी समाज मंगल कार्यालय,पहूर (ता. जामनेर, जि. जळगाव)

यांची प्रमुख उपस्थिती राहणार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री मा.प्रा. डॉ.अशोक उईके राहणार असुन या मेळाव्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ)तथाआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते

प्रमुख अतिथी: केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, राज्यमंत्री इंद्रनील नाईक,अध्यक्ष पसमंदा मुस्लीम समाज अभ्यास समिती इद्रिस मुलतानी,जळगाव जिल्ह्यातील खासदार व आमदार, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बनसोड, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर आणि आदिवासी विकास विभाग नाशिकचे अपर आयुक्त दिनकर पावरा. मेळाव्यातील वैशिष्ट्ये:आदिवासी विकास व इतर शासकीय विभागांच्या कल्याणकारी, शैक्षणिक, आर्थिक, गृहनिर्माण व स्वरोजगार योजनांचे माहिती कक्ष (Stalls) उभारले जाणार.तिथे प्रत्यक्ष मार्गदर्शन, कागदपत्रे आणि ऑनलाइन अर्जाबाबत माहिती मिळेल.

नाशिक विभागातील आश्रमशाळां मधील विशेष प्रावीण्य मिळविलेल्या ३मुले व ३ मुली अशा एकूण ६ गुणवंत विद्यार्थ्यांना ‘राघोजी भांगरे विद्यार्थी गुणगौरव’ पुरस्काराने सन्मानित केले जाणार.पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे पारदर्शक पद्धतीने निवड झालेल्या शिक्षकांना सेवा नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार असून.तडवी- भिल्ल समाजबांधव, महिला, युवक आणि लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ITDP यावलचे प्रकल्प अधिकारी  यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे