चुंचाळे येथे आज पासुन भव्य दिव्य सांगितमय श्रीमद देवी भागवत कथेचे आयोजन सजिव देखाव्याचे होणार सादरीकरण..

यावल ( प्रतिनिधी )- तालुक्यातील चुंचाळे येथे श्री समर्थ सुकनाथ बाबा यांची तपोभूमी श्री समर्थ रघुनाथ बाबा यांची जन्मभूमी व श्री समर्थ वासुदेव बाबा यांच्या कर्मभूमीत व राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. गजानन महाराज धानोरकर यांच्या प्रेरणेने व चुंचाळे ग्रामस्थाच्या सहकार्याने भव्य दिव्य संगीतमय श्रीमद् देवी भागवत. कथा येथे दिनांक ३० ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे
या कालावधीमध्ये दैनंदिन कार्यक्रम सकाळी काकडा आरती ५ ते ६ संध्या ६ ते ७ हरिपाठ व श्रीमद् देवी भागवत कथा रात्री ८ ते ११ या वेळेत कथेचे प्रवक्ते राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. गजानन महाराज धानोरेकर वाल्मीक आश्रम चिंचखेडा जामनेर यांच्या मुखातून लाभणार आहे व त्यांना साथ संगत गायनाचार्य समाधान महाराज धानोरेकर, दीपक महाराज सतखेडा, मृदुंगाचार्य पियुष महाराज धानोरेकर, तबलावादक शुभम महाराज मुक्ताईनगर, ऑर्गन वादक मुकुंद महाराज खेरडा मलकापूर हे लाभणार आहे
आणि काल्याचे किर्तन ह भ प राष्ट्रीय कीर्तनकार गजानन महाराज धानोरेकर यांचे ६ नोव्हेंबर २६ रोजी काल्याचे किर्तन होईल दिनाक ६ रोजी सायंकाळी ४ ते ७ यावेळी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे दिनांक ६ नोव्हेंबर २६ शुक्रवार रोजी महाप्रसाद दुपारी १२ ते ४ या वेळेत होईल या कार्यक्रमाला परिसरातील भाविक भक्तांनी कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन चुंचाळे येथील श्री समर्थ वासुदेव बाबा भजनी मंडळ व ग्रामस्थ यांनी केले आहे