जळगाव जिल्हा

कानळदा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी..

पारंपरिक वेशभूषा व सामूहिक नृत्यातून आदिवासी बांधवांनी घडवले सामाजिक एकतेचे दर्शन

कानळदा,-येथील गावकऱ्यांनी १५ नोव्हेंबर रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी केली. या निमित्ताने संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या जयंती सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे आदिवासी बांधवांनी केलेली पारंपरिक वेशभूषा आणि सामूहिक नृत्य. महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आपल्या समृद्ध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे जयंतीचा आनंद द्विगुणित झाला. या माध्यमातून गावकऱ्यांनी सामाजिक एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.

भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, स्वाभिमानासाठी आणि अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आजही समाजाला प्रेरणा देणारा आहे. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी माजी सरपंच पुंडलिक सपकाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राधेश्याम चौधरी, जळगाव वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम,डॉ. बारेला, सुभाष बारेला, कुवरसिंग, कांतीलाल, सीताराम, प्रेमसिंग, थावर, तुफान यांच्यासह गावातील अनेक मान्यवर व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकता, संस्कृती आणि अस्मितेचा संदेश देणारी ही जयंती कानळदा गावासाठी अभिमानाचा क्षण ठरली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे