जळगाव

रामानंद नगर पोलिसांची कारवाई; दोन दुचाकी चोरांना अटक, चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत..

जळगाव : शहरातील दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रामानंद नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन संशयित आरोपींना अटक करून चोरीच्या एकूण पाच मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या दुचाकींची एकूण किंमत सुमारे एक लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.पिंप्राळा येथील रथचौक परिसरात राहणारे बापू दत्तू कोळी यांच्या मालकीची बजाज प्लॅटिना (क्रमांक MH-19-BE-8161) ही मोटारसायकल ९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाकडून सुरू होता. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कांचननगर परिसरातून निर्मल राजेंद्र ठाकूर याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने साथीदार मनोज मोहन रंधे (रा. नशिराबाद) याच्यासोबत मिळून जळगाव शहर, चोपडा, पिंप्राळा परिसर आणि इच्छादेवी चौकातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.यानंतर पोलिसांनी मनोज रंधे याला नशिराबाद येथून ताब्यात घेऊन १६ नोव्हेंबर रोजी अटक केली. दोन्ही आरोपींना १९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. या कालावधीत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी चोरीच्या पाच मोटारसायकली हस्तगत केल्या.

हस्तगत केलेल्या दुचाकी

१. बजाज प्लॅटिना (काळ्या रंगाची) – १५ हजार रुपये. रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

२. फॅशन प्रो – ३० हजार रुपये. चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

३. बजाज प्लॅटिना – २५ हजार रुपये. धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

४. सीडी डिलक्स – २० हजार रुपये.

५. सीटी १०० (लाल रंगाची) – १० हजार रुपये. शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोधपथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंधाटे, मुकुंद गवते आणि सागर नन्नवरे यांनी केली.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे