जळगाव

संत नामदेव महाराज जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी आमदार राजूमामा भोळे यांची विधानसभेत मागणी

जळगाव (प्रतिनिधी) – श्री संत नामदेव महाराज यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी, अशी मागणी आमदार राजूमामा भोळे यांनी अधिवेशनात (ता. १५) रात्री अकराच्या सुमारास विधानसभेत केली.

महाराष्ट्र शासनाने विविध संत, महात्मे व महापुरुषांच्या जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात काढण्यात आलेल्या अध्यादेशात राष्ट्रसंत श्री संत नामदेव महाराजांच्या जयंतीचा समावेश नसल्याने जळगाव येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेसह समस्त शिंपी समाजातर्फे आमदार राजूमामा भोळे यांना दोन वर्षांपूर्वीच निवेदन दिले होते. त्यानुसार, आमदार भोळे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. सध्या मुंबईत सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुधवारी (ता. १५) आमदार भोळे यांनी रात्री अकरा वाजता संत शिरोमणी नामदेव महाराज यांची शासकीय स्तरावर जयंती साजरी करण्याच्या प्रस्तावाचे निवेदन शून्य प्रहर कामकाजप्रसंगी केले. संत नामदेव महाराजांची जयंती ही शासकीय गॅजेटमध्ये नोंदवून शासकीय स्तरावरुन ती साजरी करण्याचा प्रस्ताव सादर केला. आमदार भोळे यांनी समस्त समाजबांधवांच्या भावना लक्षात घेऊन हा प्रश्‍न विधीमंडळात मांडल्याने त्यांचे शिंपी समाजातर्फे कौतुक होत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकरी संप्रदाय व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वारकरी बांधवांना श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे जाहीर केले. त्याबद्दल समस्त शिंपी समाजाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचेही आभार मानले आहेत. आमदार राजूमामा भोळे यांनी समस्त शिंपी समाजाच्या भावना लक्षात घेऊन समाजाला न्याय देण्याचे काम केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आमदार सुरेश भोळे यांचे जळगाव हितवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, उपाध्यक्ष विवेक जगताप, अखिल भारतीय युवक संघटनेचे माजी अध्यक्ष मनोज भांडारकर, सचिव अनिल खैरनार, दीपक जगताप, दिलीप सोनवणे, मुकुंदराव मेटकर, सुरेश सोनवणे, चेतन खैरनार, प्रदीप शिंपी, सतीश पवार, अरूण मेटकर, राजेंद्र बाविस्कर, सतीश जगताप, युवक अध्यक्ष जितेंद्र शिंपी, महिला अध्यक्षा रेखा निकुंभ, शाखाध्यक्ष रत्नाकर बाविस्कर, गणेश सोनवणे, सुधाकर कापुरे, चेतन पवार, किरण शिंपी, अशोक शिंपी, नानाभाऊ सोनवणे, डिगंबर मेटकर, शैलेंद्र मांडगे आदींनी आभार व्यक्त केले आहेत

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे