गुन्हेगारीब्रेकिंग

पंधराशे रुपये लाच घेतांना तलाठ्या सह महिला कोतवालास अटक

भडगाव(प्रतिनिधी)- तालुक्यातील भोरटेक बुll तलाठी कार्यालयाचे हद्दीमध्ये तक्रारदार यांची वडीलोपार्जित शेतजमिन आहे. सदर शेत जमीनीचे ७/१२ उताऱ्यावर स्वतः तक्रारदार यांचे व सोबत ईतर ०९ असे एकुण १० वारसांची नावे लावणे व तशी नोंद घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे तलाठी सलीम अकबर तडवी व कोतवाल कविता नंदु सोनवणे यांनी २५००/रु.लाच रकमेची मागणी केलेली होती त्यापैकी तलाठी सलीम अकबर तडवी यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून जागेवरच १,०००/- रुपये घेतलेले होते व उर्वरीत रक्कम १५००/-रुपये लाचेची मागणी केली होती.दरम्यान तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीची पडताळणी करण्यासाठी लाचलुचपत विभागाने सापळा रचला असता दि.१४ एप्रिल शुक्रवारी दुपारी तलाठी सलीम अकबर तडवी व कोतवाल कविता नंदु सोनवणे, यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे १५००/- रुपये लाच रकमेची मागणी केली. व सदर मागणी केलेली लाचेची रक्कम स्वतः तलाठी सलीम अकबर तडवी यांनी कोतवाल कविता नंदु सोनवणे, यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष  भोरटेक बुll तलाठी कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. या दोन्ही विरुद्ध भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे