खान्देश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटनेच्या वतीने 15 ऑगस्ट रोजी अन्न पाणी त्याग आमरण उपोषणाचा इशारा..
जळगाव – दि. 24 रोजी आमचे खान्देश रेल्वे मालधक्का माथाडी कामगार संघटने चे अध्यक्ष आबा भाऊ बाविस्कर यांच्या मार्गद्शनाखाली आज दरवाढ बाबत आज अप्पर जिल्हाधिकारी साहेबाना निवेदन देण्यात आले.
त्यात असे नमूद होते की, दिनांक 01/01/2024 रोजी अध्यक्ष जळगाव माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ जळगाव यांच्या कार्यालयात मजुरी दरवाढ संदर्भात अर्ज केला होता त्या अर्जाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त तथा अध्यक्ष माथाडी व सुरक्षित कामगार मंडळ जळगाव यांनी दिनांक 22/04/2024 रोजी मजुरी दरवाढ बाबत आदेश पारित केले परंतु सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आदेश देऊन सुद्धा नवीन दरवाढ नुसार आम्हाला मजूर मिळत नाही. आम्हाला तेच जुने दर आजतारखेपर्यंत मिळत आहे.
आमच्या गरिबाचे जे आर्थिक शोषण याच्या मार्फत होत आहे. हे लवकरात लवकर थांबवले गेले पाहिजे आणि जे आमच्या हक्काचे मजुरीतील दरवाढ आहे ती आम्हाला लवकरात लवकर मिळून द्यावी. तसेच 1 जानेवारी 2024 ते आज तारखेपर्यंत जे काही आमचे भाववाढीचे फरक चे पैसे निघतात ते सुद्धा आम्हाला देण्यात यावे.अन्यथा आम्हा गरीब हमाल आमरण उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही त्याकरिता आम्ही आम्हाला दिनांक 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यालयाबाहेर अन्न पाणी त्याग आमरण उपोषण करू असा इशारा खान्देश रेल्वे मालधक्का व माथाडी कामगार संघटनेतर्फे देण्यात आला आहे.
निवेदन देत्या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष लहू सुपडू हटकर, संघटनेचे सचिव विशाल अजय सुरवाडे, संघटनेचे सभासद संतोष हटकर, विकी दीपक माने, इमरान नुर शेख, भूषण पंडित रांजण व इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.