महाराष्ट्र

बारामती करांनी लोकसभा निवडणुकीत बहिण लाडकी असते दाखवल्याने सत्ताधाऱ्यांना लाडकी बहिण योजना आणावी लागली -रोहिणी खडसे

बारामती – बारामती करांनी लोकसभा निवडणुकीत बहिण हि लाडकी असते हे दाखवून दिल्या मुळे सत्ताधाऱ्यांना राज्यातील सर्व महिला भगिनी या लाडाच्या बहिणी झाल्या त्यामुळे महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणावी लागली असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बारामती येथे आयोजित मेळाव्यात केले

विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 299 व्या जयंती निमित्ताने बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा सुप्रिया सुळे, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भूषणराजे होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या एक महिला म्हणून नेहमी अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकर्त्या धोरणांचा नेहमी आदर वाटतो एका महिलेवर विश्वास टाकला तर ती उत्कृष्ट राज्यकर्ता होऊ शकते हे आपण अहिल्याबाई यांच्या कार्यातून आचरणातून अनुभले

आज आपण भारत भर भ्रमण करत असताना अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या, जीर्णोद्धार केलेल्या वास्तू बघतो तेव्हा अभिमान वाटतो तिनशे वर्षाचा कालावधी लोटला तरी त्या वास्तू अजुनही सुस्थितीत आहेत त्या काळी आजच्या सारखे तंत्रज्ञान नसताना सुद्धा त्यांनी बांधलेल्या वास्तू स्थापत्य कलेचा उत्कृष्ट नमुना असुन अजून सुद्धा त्या सुस्थितीत आहेत नाहीतर याउलट आज बांधकाम केलेल्या वास्तू रस्ते यांची वर्षभरात दुर्दशा होते,जेव्हा महिला राज्यकर्त्या म्हणून पुढे येतात तेव्हा त्या उत्कृष्ट पणे काम करू शकतात हे अहिल्याबाई होळकर यांनी तिनशे वर्षा पूर्वी दाखवून दिले हीच बाब शरद पवार यांनी हेरली महिलांना संधी दिली तर त्या उत्कृष्ट कार्य करू शकतात हे हेरून शरद पवार यांनी महिलांना राजकारणात व इतर क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आरक्षण दिले म्हणून आज आम्ही महिला सर्व क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने उत्कृष्ट कार्य करू शकतो.बारामती करांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने विजयी करून दाखवून दिले बहिण हि लाडाची असते त्यामुळे सत्ताधाऱ्यांना महिलांचे महत्व कळले व त्यांना महिलांसाठी मुख्यमंत्री बहिण लाडकी योजना आणावी लागली

लाडक्या बहिणीच्या विरोधात प्रचार केला त्याच लाडक्या बहिणीच्या नावाने योजना आणावी लागते याचे श्रेय बारामती करांना जाते त्याबद्दल बारामती करांचे अभिनंदन आणि सुप्रियाताई सुळे यांना बहुमताने निवडून दिल्या बद्दल आभार व्यक्त करते असे प्रतिपादन रोहिणी खडसे यांनी मेळाव्यात संबोधित करताना केले यावेळी आ.संजय जगताप, राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, जेष्ठ नेते उत्तमराव जानकर,लक्ष्मण माने, संभाजीराव झेंडे, रामभाऊ टुले, एस एन बापू जगताप, सतिशमामा खोमणे, यांच्यासह उत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Yogesh Chaudhari

सदर न्युज वेबपोर्टल हे जळगाव येथून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात प्रसारित होते. या ऑनलाइन न्युज पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही (जळगाव न्यायक्षेत्र) Mo. 8668472226

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे