ऑनलाईन रेशन धान्य वाटपात अडचणी; तहसीलदारांना निवेदनाद्वारे मुदत वाढीची मागणी..
(नंदुरबार जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी) : तालुक्यातील रेशन दुकानदारांना ऑनलाईन धान्य वाटपात येणा-या अडचणीबाबत तहसीलदार दीपक गिरासे यांना तालुका अध्यक्ष अरविंद कुवर यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. तहसीलदार दीपक गिरासे यांना दिलेल्या निवेदनात शहादा तालुक्यातील रेशन दुकानदारांनी असे म्हटले आहे की, गेल्या 7 जुलै 2024 पासून ईपाॅस मशिनवर धान्य वाटपात अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. दररोज केव्हाही सर्व्हर डॉऊन होत असतो. अद्याप पावेतो 90% वाटप बाकी आहे. दुकानदार व ग्राहक यांचा दररोज संघर्ष व भानगडी सुरु आहेत. ई-पॉस मशिनचा तांत्रीक दोष दूर करावा व पुढच्या महिन्याचा 10 ऑगष्ट 2024 पर्यंत जुलै महिन्याचा वाटपासाठी मुदत वाढ द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर रेशनदार दुकान संघटनेचे तालुकाध्यक्ष अरविंद कुवर, बी. टी. चौधरी, एम. एम. पाटील, संतोष पावरा, महेंद्र पावरा यांच्यासह असंख्य रेशन दुकानदारांच्या सह्या आहेत.