पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते अनावरण..
जळगाव,(प्रतिनिधी)- लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असलेल्या प्रसार माध्यम क्षेत्रातील प्रश्नावर जनजागृती व्हावी यासाठी प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली २८ जुलै रोजी सुरु होतं असलेल्या पत्रकार संवाद यात्रेच्या पोस्टरचे अनावरण जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांच्या शुभहस्ते जैन हिल येथे करण्यात आले.
यावेळी पत्रकार संघांचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, जैन उद्योग समूहाचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी,इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गोसावी, ऍड. दिपक सपकाळे,जिल्हाध्यक्ष भूषण महाजन, महानगराध्यक्ष योगेश चौधरी,संघटक गौरव राणे,चेतन पाटील, प्रथमेश मराठे यांची उपस्थिती होती. दरम्यान पत्रकार संवाद यात्रेच्या उद्देशाबाबत व पत्रकार, वृत्तपत्रांच्या मागण्यासंदर्भात अशोकभाऊ जैन यांना प्रविण सपकाळे यांनी माहिती दिली.
पत्रकार संवाद यात्रेला दीक्षाभूमी नागपूर येथून सुरवात होतं असून जळगावात ३१ जुलै रोजी दुपारी दोन वाजता यात्रा पोहचणार आहे. दरम्यान आकाशवाणी चौकात यात्रेचे भव्य स्वागत, त्यानंतर पत्रकारांशी संवाद होणार आहे. तरी जळगाव जिल्ह्यातील पत्रकार बांधवानी मोठया संख्येने पत्रकार संवाद यात्रेत सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी सामील व्हावे असे आवाहन पत्रकार संघांचे राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे यांनी केले आहे.
संवाद ही शांततेच्या मार्गाने प्रामाणिक,सुरक्षीत चर्चा आहे.ज्यामुळे लोकांच्या समस्या मांडणाऱ्या,पत्रकारांचे प्रश्न सरकारला सांगण्याची व पत्रकारांच्या वेदना, समजून घेण्याची संधी प्रदान करणार आहे. ”संवाद ही एक मूलभूत प्रक्रिया आहे. जी थेट वैयक्तिक आणि संस्थात्मक बदल घडवून आणते.पत्रकारितेच्या इतिहासात पहिल्यांदाच पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी व लोकशाहीच्या बळकटीसाठी *पत्रकार संवाद यात्रा* निघत आहे. लोकशाहीत माध्यम व्यवस्था सक्षम राहिली तर सामान्य माणसाचा आवाज बुलंद राहील म्हणूच या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रविण सपकाळे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वय कळविले आहे.
ईतर महत्वाच्या बातम्या